ज्ञानोबा कराळे पा. ग्रंथालय

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पवित्र पावन असलेल्या भंडारा डोंगर या भूमीमध्ये संत तुकाराम ज्ञानपीठाने भव्य वास्तू बांधली असून या वास्तूंमध्ये ज्ञानोबा कराळे पाटील यांच्या नावाने ग्रंथालय चालू केलेले आहे.या ग्रंथालयामध्ये संत साहित्य ,इतिहास,समाजशास्त्र,मानसशास्त्र तत्त्वज्ञान या विषयांवरील ग्रंथसंपदा वाचकांसाठी उपलब्ध आहे .तुका म्हणे आम्हा एकांताचा वास॥ या तुकोबारायांच्या वचनाप्रमाणे भंडारा डोंगरावर वाचन करण्यासाठी ग्रंथालयाची निर्मिती क्रिया सून या ठिकाणी अभ्यासकांना निवासाचीही व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे तरी  संशोधक अभ्यासक आणि साधकांनी या शिबिराचा जरूर लाभ घ्यावा