आमच्या विषयी

अजय महाराज बारस्कर यांनी आपल्या किर्तन सेवेची सूरवात संत तुकाराम महाराज संस्थान सावेडी गाव अहमदनगर येथून ९ मार्च २००७ रोजी जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या महापरिनिर्वाण दिनी प्रवचनाने सुरवात केली.या छोटेखानी प्रवचनाने जीवनात अमुलाग्र परिवर्तन झाले.महाराष्ट्राचे सामाजिक तीर्थक्षेत्र सिंदखेड राजा येथे एका सत्पुरुषाच्या आशीर्वादाने राजमाता जिजाऊ साहेब यांच्या जन्मस्थळी जाहीर कीर्तन झाले.पंढरीची वारी करताना महाराजांच्या कीर्तनसेवेचा विकास होत गेला.सामाजिक प्रबोधन आणि आंतरिक परिवर्तन या दोन्ही गोष्टींचा प्रचार,प्रसार करण्याचे काम महाराज करीत आहेत.आजवर महराजांचे महाराष्ट्रभर आणि गुजरात ,राजस्तान ,कर्नाटक आदी ठिकाणी कीर्तन प्रवचन व व्याखानाचे कार्यक्रम केलेले आहेत.

अजय महाराज बारस्कर यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा पोवाडा,महा सम्राट बळी राजाचा पोवाडा,लोकशाहीचा पोवाडा असे पोवाडे रचून गायलेले आहेत.

संत तुकारामाचे अभंग शतक गायन अर्थासह CD रुपात प्रकाशित केलेले आहेत.

संपादन/लेखन

अनिकेत अवचर (मृदुंग वादक )