स्वगृह

प्रस्तावना

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे तत्वज्ञान विचार हे कालातीत आहे,म्हणजे काल आज आणि उद्याही चिरंतन असणारे विचार आहेत.मानव जातीला प्रगत आणि सुखी करणारे तत्वज्ञान महाराजांनी आपल्याला अभंग गाथेमधून दिले आहेत. आपल्यात परिवर्तन घडवायचे असेल तर गाथा मार्ग हा उत्तम मार्ग आहे. अभंग गाथेचे पाठांतर करून नाहीतर या अभंगानुसार आचरण करून नाहीतर या अभंगानुसार आचरण करून आपणास यश , ज्ञान, संपत्ती, सुख, समाधान, आनंद मिळवता येते. यासाठी स्वतच प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते. यालाच प्राचीन भारतात तप करणे असे म्हटले  जाते. तप करणे म्हणजे मनावर विजय मिळवणे ज्याने आपल्या मनावर विजय मिळवला तोच मनुष्य यशस्वी तपस्वी म्हणून गणला गेला  म्हणूनच महाराजांनी मन करारे प्रसन्न | सर्व सिद्धीचे कारण || हा सिद्धांत आपल्याला दिला. याच सिद्धांतानुसार मनाला चित्ताला केंद्रस्थानी ठेऊन परिवर्तन घडवण्यासाठी संत तुकाराम वारकरी विध्यापिठ कार्य करीत आहे.

यारे यारे लहान थोर | याती भलती नारी ||

सुखाच्या,आनंदाच्या मार्गावर येण्यासाठी जगतगुरू तुकाराम महाराजांनी सर्वाना हाक मारली आहे. सर्वाना आनंदी सुखी होण्याचा अधिकार आहे.  सकळासी येथे आहे अधिकार || यामध्ये जात,पात,धर्म असा अडथर नाही. मनुष्याला श्रेष्ठत्वाकडे जाण्यासाठी गुण व अवगुण हेच कारणीभूत आहेत.  गुण अवगुण हे दोन्ही प्रमाण | जातीसी कारन नाही येथे ||

 

तुका म्हणे खातो आनंदाचा लाडू ||

आनंद म्हणजे उत्साह दखरहित अवस्था, प्रसन्नता हा आनंदाचा लाडू करून महाराज आपणास देत आहेत. जगातील सर्व लोकांना हा आनंदाचा लाडू हवा आहे. मग तो मनुष्य कोणत्याची धर्माचा असो. हा आनंदाचा लाडू फक्त संतांच्या दुकानात मिळतो तोही विनामूल्य. घातीला दुकान | देती आलियासी दान || संत उदार उदार | भरले आनंद भंडार ||

 

संत संगती निरंतर ||

संत कुणाला म्हणावे याचा अतिशय स्पस्ट व स्वच्छ व्याख्या महाराजांनी केलेल्या आहेत. संताच्या संगतीमध्ये राहिले असता उत्तम विचार चांगले गुण , ज्ञान , भक्ती , प्रेम ,इत्यादी सर्व गोष्टी मिळतात महाराज सांगतात संत समागमी धरावी आवडी || म्हणूनच या विद्यापीठाने जगभरातील संत वृत्तीच्या व्यक्ती , सत्यशोधक , तपस्वी , तत्वज्ञानी , मनोवैज्ञानिक , आदींच्या सानिध्यात राहण्यासाठी व त्यांचे विचार जाणून घेऊन , स्वविकास करण्यासाठी आधुनिक विज्ञानाच्या सहाय्याने व्यवस्था केली आहे.

अभ्यासासी संग कार्यसिद्धी ||

भंडारा, भामचंद्र व घोराडेश्वर या डोंगरावर महाराजांनी जे लोकांतापासून दूर जाऊन एकांतात चिंतन केले , जो अभ्यास केला तो अलौकिक आहे. पंधरा दिवस भामचंद्रावर गुहेमध्ये राहून कंदमुळे सेवन करून मनावर इंद्रीयांवर विजय मिळवला. सकल जणांचे दुख दूर करने. हे आपल्या जीवनाचे उदिष्ट त्यांनी ठरवले. परिवर्तनाचा अभ्यास करत असताना त्यांनी पराकोटीचा निग्रह केला महाराजांच्या शब्दात सांगायचे तर व्याघ्र सर्प विंचू अंगाशी झोंबले | पीडू जे लागले सकळीक || एकाच जागेवर बसून चिंतन मनन अभ्यास करणे किती अवघड असते याची तुलना महाराजांनी साप , वाघ , विंचू या प्राण्यांबरोबर केली आहे. काहीही झाले तरी चालेल पण मनावर विजय मिळवायचाच हि प्रतिज्ञा करूनच महाराज भाबगिरी वर बसले ती गुहा आजही साक्ष देत आहे. आपणही मनाचा निर्धार करून चिंतन केलेच पाहिजे. ज्ञानोबारायांच्या वचनानुसार तेथेही मनाचा निर्धारु असे || हा निर्धार केला तर नव्हे ऐसे काही नाही अवघड || अशक्य काहीच नाही सर्व गोष्टी साध्य होतातच.

ह.भ.प.अजय महाराज बारस्कर

समन्वयक संत तुकाराम विद्यापीठ पुणे